ट्रॅक्टर ट्रॉली व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू
Raju Tapal
October 28, 2021
30
ट्रॅक्टर ट्रॉली व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू ; बारामती -इंदापूर राज्यमार्गावरील बेलवाडी ता.इंदापूर येथील घटना
बारामती - इंदापूर राज्यमार्गावरील बेलवाडी जवळ ट्रॅक्टर ट्रॉली व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.२७/१०/२०२१ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
बाळू दामू माळी वय -४५ रा.कळशी ता.इंदापूर असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
ट्रॅक्टरचालक बाळू माळी हे ऊसाचा दोन ट्रेलर भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली घेवून बुधवार दि.२७/१०/२०२१ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जंक्शन बाजूकडून भवानीनगरच्या दिशेने चालले होते.
बेलवाडीजवळच्या खारा ओढ्याच्या पुलावर यावेळी बारामती कडून इंदापूरच्या दिशेने चाललेल्या चारचाकी गाडीची व ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला.
झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक बाळू माळी यांच्या अंगावरती ऊसाचा ट्रेलर पडल्याने बाळू माळी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात ट्रॅक्टरचे जास्त नुकसान झाले. ट्रॅक्टरचे पाठीमागील व पुढील चाके तुटली असून चक्काचूर झाला.
पोलीसांनी चारचाकी चालक तुषार तुकाराम आईनकर रा.ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून विकास सदाशिव मत्रे रा.पिंपरे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस हवालदार गुलाबराव पाटील अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान इंदापूर तालुक्यातील बेलवाडीजवळ बारामती -इंदापूर राज्यमार्गावरील खारा ओढ्यावरती असलेला पूल अतिशय अरूंद आहे. अरूंद पुलावरून दोन वाहने एकाचवेळी ये -जा करत असताना अपघात होत आहेत. आतापर्यंत अरूंद पुलामुळे शेकडो अपघात झालेले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. खारा ओढ्यावरती असलेल्या अरूंद पुलाचे रूंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
Share This