भाट्ये येथील उतारात पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटी
रत्नागिरी सागरी मार्गावरील भाट्ये येथील तीव्र उतारावर पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. रत्नागिरी ते पावस या सागरी महामार्गावर (एमएच १० सीआर १०९१) पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात तीव्र उतारावर झाला असून बांधकाम विभागाने नुकतेच या रस्त्याचे रुंदीकरण केले होते. परंतु आता या ठिकाणी अनेक दुचाकींचे अपघात झाले असून या रस्त्यावर तीव्र उतार असल्याचा फलक लावणे गरजेचे आहे.
रस्ते अपघाताची जिल्ह्याची झालेली बैठक यामध्ये हा रस्ता रुंद आणि तीव्र उतार कमी करणारा करावा, अशी मागणी १० वर्षापूर्वी करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे.