ट्रकखाली सापडून क्लिनरचा मृत्यू ; पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटातील घटना
Raju Tapal
November 18, 2021
31
जालन्याकडे कांदा घेवून जात असलेला ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने पाथर्डी तालुक्यातील केळवंडी गावाच्या हद्दीतील माणिकदौंडी घाटामध्ये ट्रक पलटी होवून क्लिनरचा जागीच मृत्यू झाला.
रविंद्र उर्फ रविराज बप्पासाहेब खंडेभराड वय -२४ रा. डोमेगाव ता.अंबड जि.जालना असे मृत क्लिनरचे नाव आहे.
बारामतीहून कांदा घेवून जालन्याकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच २१ एक्स २९९ वरील चालकाचा ताबा सुटल्याने माणिकदौंडी घाटाच्या धोकादायक वळणावर ट्रक पलटी झाला.
या घटनेत क्लिनर रविंद्र हा गाडीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली.
मयत रविंद्रचे वडील बप्पासाहेब खंडेभराड यांनी पोलीसांत फिर्याद दिली असून ट्रकचालक संदीप दत्ता भडांगे याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
Share This