• Total Visitor ( 133100 )

तुळजाभवानी चरणी अर्धा किलो सोन्याचा मुकुट 

Raju tapal February 26, 2025 11

तुळजाभवानी चरणी अर्धा किलो सोन्याचा मुकुट 

माता तुळजाभवानी मंदिरात श्रद्धेपोटी भाविक सुवर्ण अलंकार, महावस्त्र, प्रतिमा अर्पण करत असतात. अशाच ठाण्यातील एका भाविकाने श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्धा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. मंदिर संस्थानतर्फे या कुटुंबाचा देवीची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. भक्ताच्या विनंतीनुसार त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. 

कोरीव नक्षीकाम असलेल्या या मुकुटाची सध्या तुळजापुरात मोठी चर्चा आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी ठाणे स्थित भक्ताने 540g म्हणजे सुमारे अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले.

 

Share This

titwala-news

Advertisement