ऊसाच्या ट्रॉलीला चारचाकीची पाठीमागून धडक ; तिघांचा मृत्यू
ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून चारचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला.
बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणीक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी, बहिण बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा अपघातात मृत्यू झला असून हा अपघात मंगळवार दि.१८ जानेवारीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तरडोलीनजिक झाला.
एका धार्मिक कार्यक्रमासाठी हे सर्वजण पुण्याला गेले होते.
कार्यक्रम आटोपून रात्री बारामतीला निघाले असताना तरडोलीपासून पुढे आले आल्यानंतर ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने मागून गाडी धडकून हा अपघात झाला असे समजते.
या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी त्या महिलेला पुण्याला हलविण्यात आले आहे.