• Total Visitor ( 429608 )
News photo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण 

Raju tapal December 15, 2025 33

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण 



केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती



राजू टपाल. 

मुंबई :- मुंबईतील पवई आयआयटी येथे महामानव,बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. नदन निलेकणी मुख्य भवन येथे बसविण्यात आलेला सदरील पुतळा हा तब्बल सहा फूट उंचीचा असून तब्बल ५५० किलो वजनाचा गन मेटल धातू पासून बनविलेला आहे. यावेळी रामदास आठवले यांच्या सोबत माजी मंत्री अविनाश महातेकर,संचालक प्रोफेसर शिरीष केदारे,उप संचालक प्रो.रवींद्र गुंडी,उपसंचालक प्रो.मिलिंद अत्रे,माजी उप संचालक प्रो.के व्ही के राव,कुलसचिव गणेश भोरकडे,डीन प्रोफेसर आर.वेदागिरी,संपदा विभागातील राजेश मते व नितीन ओव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदरील पुतळा बसविण्यासाठी आलेल्या अडचणींचा पाढा विलास बेलेकर यांनी मांडला. सदरील कार्यक्रमासाठी आयआयटी मुंबई एसी एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोशियन(एमकेएस) चे सल्लागार विलास बेलेकर,प्रो.मधु एन.बेलूर,बाळासाहेब  गरुड,अध्यक्ष रमेश गायकवाड,उपाध्यक्ष संजय भोसले,जनरल सेक्रेटरी पी.एस.पाटेकर,कोषाध्यक्ष विक्रांत तांडेल,सह सचिव राजकुमार जमधाडे,कार्यकारणी सदस्य संतोष सांबरे,विनोद जगताप,संतोष नरवाडे,भगवान पगारे,नितीन गेडाम इत्यादींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement