• Total Visitor ( 84684 )

ऊस वाहतूक करणारा ट्रक खड्ड्यात गेल्याने चालकाचा मृत्यू

Raju Tapal December 15, 2021 29

ऊस वाहतूक करणारा ट्रक खड्ड्यात गेल्याने चालकाचा मृत्यू ; शिरूर तालुक्यातील घटना

 

ऊस वाहतूक करणा-या ट्रकचालकाला रस्त्यावरील  धोकादायक एस कॉर्नरच्या वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक खोल गटारात जावून झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला.

आकाश भाऊसाहेब भांबेरे रा.गुळूंचवाडी ता.जुन्नर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ट्रकचालकाचे नाव असून रविवारी दि.१२/१२/२०२१ रोजी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात चांडोह - पिंपरखेड हद्दीवरील धोकादायक एस कॉर्नरवर झाला.

ऊसाने भरलेला आयशर ट्रक क्रमांक एम एच १४ जी. डी. ४९९१ बेल्हा - जेजुरी राज्य मार्गाने पराग साखर कारखान्याकडे जात होता. 

ट्रकचालकाला धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पिंपरखेडचे पोलीस पाटील सर्जेराव बो-हाडे, शरद बोंबे, सुभाष जगताप, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

टाकळीहाजी दुरक्षेत्र पोलीसांनी अपघाताची पाहणी करून पंचनामा केला.

समीर गोरक्षनाथ गायकवाड यांनी अपघाताची माहिती शिरूर पोलीसांना दिली. 

Share This

titwala-news

Advertisement