ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला खाजगी बसने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ,दोन जण जखमी ; पुणे - सोलापूर महामार्गावरील गागरगाव हद्दीतील घटना
Raju Tapal
November 20, 2021
40
ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला खाजगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
पुणे - सोलापूर महामार्गावरील गागरगाव हद्दीत गुरूवार दि.१८ नोव्हेबरला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
आदित्यराज विश्वासराव देवकाते वय - १७ असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव रंगनाथ देवकाते रा.देवकाते वस्ती,मदनवाडी ता.इंदापूर , संतोष अंकूश पवार रा.पौंधवाडी अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
राजेंद्र सर्जेराव देवकाते वय - ३८ रा.मदनवाडी ता.इंदापूर यांनी या अपघाताची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दिली.
गुरूवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ऊसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४२ क्यू ४१२२ पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर फुटला. हा टायर बदलत असताना पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणा-या खाजगी बस क्रमांक एम एन ०१ बी १४४० वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक बसली.
अपघातात मृत्यू झालेला आदित्यराज हा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वासराव देवकाते यांचा मुलगा असून अपघाताची घटना समजताच पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार भागवत शिंदे, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस नाईक नितीन जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खाजगी वाहनाने इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. उपचार घेत असताना आदित्यराज याचा मृत्यू झाला. आदित्यराजच्या मृत्यूने मदनवाडी गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इंदापूर पोलीस या अपघाताच्या घटनेचा तपास करीत आहेत.
Share This