वैद्यकीय अधिकाऱ्याने धमकी दिल्याचा मुरबाड मधिल पञकाराचा आरोप !
Raju Tapal
May 27, 2023
85
वैद्यकीय अधिकाऱ्याने धमकी दिल्याचा मुरबाड मधिल
पञकाराचा आरोप !
पोलीसांत तक्रार देऊन कारवाईची मागणी !
राजेश भांगे मुरबाड
मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील भंगार विक्रीत अफरातफर कारवाईची मागणी या मथळ्याखाली सा.समाजशील या वृत्त पत्रात लागलेल्या बातमीचा राग मनात ठेऊन मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद भंडारी यांनी दै नवाकाळ व सा. समाजशील चे प्रतिनीधी जयदीप अढाईगे यांना धमकी देताना माझ्याशी पंगा घेऊ नका महागात पडेल, तसेच याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिल्याने पत्रकार जयदीप अढाईगे यांनी याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.
माजी मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यांनी ग्रामीण रुग्णालयातील भंगार विक्री बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रकार जयदीप अढाईगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांची प्रतिक्रिया घेउन या विषयी बातमी प्रसारित केली होती . आज दिनांक 26 मे 2023रोजी पत्रकार जयदीप अढाईगे यांच्या शेजारी राहणारी मुलगी प्रसूती झाल्यानें ते सहकुटुंब या मुलीला पहायला गेले असतां गेली दोन महिने रजेवर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद भंडारी हे अचानक समोरं दिसल्याने त्यांना कधी हजर झाले असे विचारले असता त्यांनी याचे उत्तर देत तुम्ही माझ्या विरोधा बातमी लावली याचा राग बोलून दाखवत तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका महागात पडेल, याचे परिणाम गंभिर होतील अशी धमकी दिली. पत्रकार जयदीप अढाईगे यांची पत्नी ह्या गेल्या 16वर्षा पासुन नर्सिंग फिल्ड मध्ये कार्यरत आहे त्यानी नुकताच जून्या पेन्शन साठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संप काळात ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रसाद भंडारी यांच्या विनंती नुसार मदत केली मात्र तुमच्या पत्नीस येथे संप काळात कामावर ठेवले याची जाण ठेवली पाहिजे अश्या प्रकारे मदत करणाऱ्यालाच जाण ठेवण्याचा उपदेश केला मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील सावळा गोंधळ याकडे कायम दुर्लक्ष होत असताना भंगार विक्रीतील सत्यता मांडल्याने या अधिकाऱ्याने पत्रकारां स धमकी दिल्याने सर्व पत्रकार संघटनेने याचा निषेध केला असुन याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांना हि या घटनेची माहिती दिल्याने ते काय करवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असा कुठलाही प्रकार माझ्याकडून घडला नसून धमक्या देणे हे माझ्या स्वभावात नाही. माझ्यासोबत दवाखान्याचे इतर कर्मचारीही होते कदाचित त्यांचा काहितरी गैरसमज झाला असावा - डाॕ. प्रसाद भंडारी, वैद्यकीय अधिकारी मुरबाड ग्रामिण रुग्णालय.
Share This