• Total Visitor ( 369907 )
News photo

खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील

Raju tapal July 08, 2025 72

खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील



खेड :- खेड येथे प्रांताधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील रुजू झाल्या आहेत. येथील प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी क्रमांक 7, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे झाली असून, त्याठिकाणी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. खेडमध्ये प्रांताधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या वैशाली पाटील ह्या उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) भूम, जिल्हा - धाराशिव येथे कार्यरत होत्या.



याआधी त्यांनी सिंधुदुर्ग,गुहागर,दापोली तहसीलदार पदाचा कार्यभार उत्तमरित्या सांभाळला होता. त्यामुळे त्या याठिकाणी नवख्या नसून त्यांना कोकण व येथील भौगोलिक परिस्थितीची चांगली जाण आहे. त्यामुळे येथील जनतेला त्या योग्य प्रकारे निश्चितच न्याय देतील, असा विश्वास येथील जनतेने व्यक्त केला आहे. सोमवारी त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement