निमगाव म्हाळुंगी गावातील विविध विकास कामांचे उदघाटन गावातीलच ग्रामस्थांच्या हस्ते
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन गावातीलच ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
शिरूर हवेलीचे आमदार माऊलीआबा कटके, भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चाचे तत्कालीन प्रदेश सचिव तथा भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष जयेशदादा शिंदे , राष्ट्रवादी शिरूर तालुका अध्यक्ष रविबापू काळे यांच्या विशेष प्रयत्नातून प.सं.माजी सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या सहकार्याने निमगाव म्हाळुंगी चे तत्कालीन सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांनी धावपळ करून मंजूर करून आणलेल्या गावातील विविध विकास कामांचे "अनौपचारिक उद्घाटन" कार्य स्मरण म्हणून उत्साहात करण्यात आले.
यामध्ये श्री म्हसोबा मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे,
प्रकाश गायकवाड वस्ती ते कांबळे वस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, नवचैतन्य वस्ती ते कांबळे वस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे,काळे वस्ती ते सोरटाय मळा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे,
दशक्रिया घाट सुधारणा करणे,
निमगाव म्हाळुंगी ते ढेकणे वस्ती रस्ता करणे,भागवत वस्ती रस्ता काँक्रेट करणे इ.कामांना मंजुरी मिळाली आहे आणि रांजणगाव गणपती ते पालखी मार्ग प्रजिमा 19,आणि त्या वरील नवीन पूल बांधणे,इत्यादी कामांना 10.50 कोटी, निमगाव म्हाळुंगी ते करंजावणे रस्ता 6.50 कोटी इत्यादी रुपयांचा निधी सदर रस्त्यांना मंजूर करण्यात यश मिळाले आहे.
सदर काम माझ्या सरपंच कार्यकाळात मंजूर झाले होते.धावपळ करून मंजूर करून आणलेल्या कामांची गावक-यांना माहिती व्हावी म्हणून आज आपण या कामांचं स्मरण करून सर्व कामांचे अनौपचारिक पद्धतीने उद्घाटन केल्याचे तत्कालीन सरपंच बापूसाहेब काळे यांनी टिटवाळा न्यूज ला सांगितले. जय जवान माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कांतीलाल टाकळकर,म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भिवाजी चौधरी,म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण, संचालक काकासाहेब करपे,दिलीपराव चव्हाण, वामनराव गव्हाणे, मारुती चव्हाण, साहेबराव पवार,दत्तात्रय शिवले, सुनील काळे, सतीश भोसले, पोपट भागवत,रामभाऊ कुटे, बाबुराव चौधरी, दत्ता भागवत,शिवाजी चौगुले, दिलीप चव्हाण, संतोष धोत्रे, आशाताई धनवटे,भीमा कुसेकर, राधा कुसेकर, नंदा कुसाळे, सुमन धोत्रे,विजय धोत्रे,विशाल कुसेकर संतोष धोत्रे, मंगेश धोत्रे इ.ग्रामस्थ उद्घाटन समारंभास उपस्थित
होते.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर)