यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एम बी बी एस च्या शेवटच्या वर्षात शिकणा-या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. बुधवार दि. १० नोव्हेंबरला संध्याकाळी ही घटना घडली. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाले असून विद्यार्थ्यांनी आक्रमक होवून महाविद्यालय प्रशासन व डीन विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे.