वासुंद्री पुलास स्वर्गीय वसंतराव केणे सर यांचे नाव द्यावे
आमदार किसन कथोरे करणार पाठपुरावा
कोंढेरी :- मांडा वासुंद्री पुलास स्वर्गीय वसंतराव केणे सर यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थांची एकजूट...
टिटवाळा विभागातील कोंढेरी गावाचे सुपुत्र , सामाजिक तथा भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते टिटवाळा परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेले स्वर्गीय वसंतराव पांडुरंग केणे यांचे दिनांक 30/03/2025 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले . यावेळी त्यांना त्यांच्या कार्याबद्दल अभिवादन करण्यासाठी मांडा टिटवाळ्यातील ग्रामस्थांनी शोकसभेचे आयोजन केले होते. या शोकसभेत ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील, विविध पक्षातील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री जगन्नाथ पाटील व मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम मेहेर,बामसेफ संघटनेचे सुरेश दादा पाटील, ठाणे जिल्हा बँकेचे माजी उपव्यवस्थापक अनंत शिसवे ,जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, कल्याण डोंबिवली महापालिका माजी उपमहापौर उपेक्षाताई भोईर माजी पंचायत समिती सदस्य गिरीश म्हात्रे, आगरी उन्नती मंडळाचे सचिव रमेश कराळे योगेश धुमाळ,तसेच सांगोडे कोंढेरी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, वासुंद्री ग्रामपंचायत सरपंच व सदस्य , वारकरी संप्रदायाचे दशरथ महाराज केणे असे अनेक सर्व पक्षीय व सामाजिक काम करणारे अनेक मान्यवर व ग्रामस्थ या शोकसभेत उपस्थित होते. प्रत्येकाने स्वर्गीय वसंतराव केणे सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. व त्यांच्या संघर्षातून निर्माण झालेला वासुंद्री मांडा पुलाबद्दल अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात त्यांच्या संघर्षाचा उल्लेख केला. व ह्या पुलास स्वर्गीय वसंतराव केणे सर असे नामकरण करावे व हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असे सर्व मान्यवरांनी व मांडा टिटवाळा परिसरातील वासुंद्री कोंढेरी मांडा सांगोडे या ग्रामस्थांनी आपल्या आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात मागणी केली त्यास मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी ह्या पुलास स्वर्गीय वसंतराव केणे पुल असे नामकरण करण्यास निश्चितच मी प्रयत्न करेन जेणेकरून पुढील पिढीस त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक करायची जाणीव राहील, असे सर्व ग्रामस्थांना श्रद्धांजली वाहताना संबोधित केले.
सदर कार्यक्रमांचे सूत्र संचालन विलास गायकर माजी सरपंच मानिवली यांनी केले. सर्व मान्यवर उपस्थितांचे आभार केणे परिवाराकडून मानण्यात आले.