• Total Visitor ( 85077 )

वेगवेगळ्या अपघातात २ ठार ५ जण जखमी

Raju tapal October 12, 2021 33

वेगवेगळ्या अपघातात २ ठार ५ जण जखमी 

          ------------------------

वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.

  ट्रकचालकास पहाटे झोप लागल्याने वाहनावरील ताबा सुटून ट्रक पलटी झाल्याने ट्रकचालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील वैराग नजीकच्या उस्मानाबाद चौकात घडली.

 पीरसाहब नदाफ असे केबिनखाली सापडून जागेवरच मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

जालना येथून एम एच १२ एफ सी ८४१३ हा ट्रक सुमारे २५ टन बांधकामाची सळई घेवून सोलापूरच्या दिशेने चालला होता.पहाटे तीनच्या सुमारास वैराग ओलांडून उस्मानाबाद चौकात ट्रक आला असता चालकास झोप अनावर झाली. समोरून एक टेम्पो आला. या गडबडीत ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने धोकादायक वळणावरून ट्रक रस्त्यावरून खाली जावून उलटला. या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला.

 दुस-या घटनेत भरधाव वेगाने निघालेली चारचाकी शेंद्रे ,सातारा येथे पलटी झाल्याने आठ वर्षाची बालिका जागीच ठार झाली.

अनया सुनील चौगुले वय -८ वर्षे रा.कसबा सांगवा ता.कागल जि.कोल्हापूर असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.

सुनील चौगुले हे पत्नी आणि मुलीसमवेत चारचाकीने पुणे येथे नातेवाईकांकडे आले होते. सोमवारी सकाळी ते पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते. सकाळी ११ वाजता भरधाव वेगाने शेंद्रे येथे आले असता समोर असणा-या पिकअप टेम्पोला ओव्हरटेक करताना त्यांची चारचाकी पलटी झाली. थेट नाल्यात जावून पडली. या अपघातात पाठीमागे बसलेल्या अनयाच्या डोक्याला पायाला गंंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. सुनील चौगुले व त्यांच्या पत्नी हे दोघेही अपघातात जखमी झाले.

तिस-या घटनेत शिक्रापूर -चाकण रस्त्यावर टेम्पो व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने झालेल्या अपघातात पिकअप चालक शंकर वानखेडे सह अन्य दोघेजण जखमी झाले.

सणसवाडी येथील कंपनीचा माल घेवून पिकअप चालक शंकर वानखेडे हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ जी टी  ५५६९ पिकअप घेवून चाकणच्या दिशेने चालले होते. केवटेमळा येथे चाकण बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ डी एम  १४४८ या टेम्पोचालकाचा समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना पिकअप ला समोरून धडक बसली. या अपघातात पिकअपचालक शंकर वानखेडे गंभीर जखमी झाला. पिक अपमध्ये बसलेले मेघा गरूड व संजय गरूड हे दोघे जखमी झाले.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे या अपघाताचा तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement