• Total Visitor ( 85060 )

वेगवेगळ्या आपघातात ४ जण ठार, दोनजण जखमी

Raju Tapal November 21, 2021 39

ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. 

संजय मारूती गगे रा.नळावणे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून  योगेश धोंडीबा आहेर , संदीप पोपट शिंदे  अशी गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. 

शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नगर - कल्याण महामार्गावर गुळूंचवाडी ,जुन्नर शिवारात हा अपघात झाला. 

नगर - कल्याण महामार्गावर गुळूंचवाडी शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६ के.व्ही ६४८६ विना नंबरच्या दोन ट्रॉली घेवून जात होता. त्या दरम्यान रस्त्यावरून जाणारी मोटार ट्रॉलीला पाठीमागून जाऊन धडकली. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारचालक राहूल भास्कर हाडावळे याच्याविरूद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुस-या अपघातातील घटनेत चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार उलटल्याची घटना  संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात घडली. 

गोपाल वाल्हेराज अंकुळनेरकर हे बोटा गावांतर्गत असलेल्या  माळवाडी येथील राहाणारे असून ते काही कामानिमित्त संगमनेरला गेले होते. काम आटोपून पुन्हा ते कारमधून माळवाडीला येत होते. चंदनापुरी घाटात दुपारी आले असता त्या दरम्यान कारवरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून शेजारी असलेल्या दगडावर जावून उलटली. दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला. 

घटनेची माहिती मिळताच डोळासणे पोलीस मदत केंद्राचे पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, भरत गांजवे, सुनील साळवे, मनिष शिंदे, अरविंद गिरी,संजय मंडलिक, नंदकुमार बर्डे, नारायण ढोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तिस-या अपघातातील घटनेत दुचाकीवरून जात असताना चंदननगर येथील नागपाल रोड सोसायटीसमोर भरधाव वेगात असलेल्या वाहनाने दिलेल्या धडकेत एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. 

उत्तम सुदाम यंकुळे वय - ६५ रा.चौधरी वस्ती खराडी यांचा या घटनेत अपघाती मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाने त्यांना धडक देवून वाहनचालक तेथून पसार झाला. त्यांचा मुलगा संदीप यंकुळे याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १६ नोव्हेबरला दुपारी ही घटना घडली.

अपघातातील चौथ्या घटनेत भरधाव वेगात जाणा-या पी एम पी एम एलची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकीवरील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. 

शिवजित अजयकुमार मंडल वय -२१ रा. वडगाव मावळ ता.मावळ जि.पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून दुस-या मृत्यूमुखी पडलेल्या २५ वर्षीय तरूणाचे नाव समजू शकले नाही.

शुक्रवारी दि.१९/११/२०२१ रोजी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे - चाकण रोडवरील खालुंब्रे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. 

पी एम पी एम एल बसचालक सत्यवान कुंडलिक बेंद्रे वय -३० रा.मोशी शिवाजी वाडी टोलनाक्याजवळ मोशी याच्याविरूद्ध म्हाळूंगे चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुलाबराव मोरे वय -५५ यांनी म्हाळूंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

एम एच १४ एच यु ५९८३ या क्रमांकाच्या पी एम पी एम एल बसचालक तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर भरधाव वेगाने बस घेवून जात होता. त्यावेळी समोरून येणा-या एम एच ०४ इ जी ८६२१ या क्रमांकाच्या यामाहा एफ झेड दुचाकीला बसची जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होवून शिवजीत मंडल व एका अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला.

पोलीस उपनिरीक्षक गोसावी या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. 

Share This

titwala-news

Advertisement