• Total Visitor ( 84876 )

वेगवेगळ्या अपघातात ४ जण ठार ; ६ जण जखमी

Raju Tapal October 30, 2021 50

वेगवेगळ्या अपघातात ४ जण ठार ; ६ जण जखमी 

          

वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले.

परतूर -आष्टी रस्त्यावरील आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जवळ रिक्षा व कारची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात ३ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले.

मंठा येथील आशियाबी कुरेशी वय -३० या सासरे अब्दुल समद कुरेशी वय -५८ यांच्यासह आपल्या तीन मुलांना घेवून माहेरी आल्या होत्या. माहेरच्या नातेवाईकांना भेटून त्या मंठाकडे परत जाण्यासाठी रिक्षाने परतूरकडे निघाल्या होत्या. परतूर आष्टी रस्त्यावरील आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही अंतरावर परतूरहून येणा-या कारची आणि रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेनंतर रिक्षा दोन तीन पलट्या घेवून रस्त्याच्या कडेला असरेल्या खांबावर आदळली.

या अपघातात आशियाबी कुरेशी वय -३० , अब्दुल समद कुरेशी वय -५८, जिकरा कुरेशी वय -४ हे तिघेजण ठार झाले. अदनान कुरेशी वय - ८, अनस कुरेशी वय -६ यांच्यासह कारचालक योगेश शिंदे वय -२७, रिक्षाचालक सतिश खंदारे हे अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना जालना येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट दिली.

आळेफाटा जि.पुणे येथे अपघाताच्या झालेल्या दुस-या घटनेत  भरधाव टेम्पो आणि पिकअपच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले.

एम एच - ४२ ए क्यू ३६३६ या क्रमांकाचा टेम्पो राजुरीहून आळेफाट्याकडे भरधाव वेगाने निघाला होता. तर आळेफाट्याकडून एम एच १४ डी एम ८९११ या क्रमांकाचा पिकअप राजुरीकडे निघाला होता. दोन्ही वाहने आळेगावच्या हद्दीतील आकाशगंगा सोसायटीसमोर येताच जोरदार धडक झाली.

या अपघातात पिकअप चालक  राजकुमार गोपीनाथ हाडवळे वय -४१ रा.राजुरी याचा जागीच मृत्यू झाला.

पिक अपमधील कैवल्य प्रकाश औटी वय -१५ रा.राजुरी, आणि आयशर टेम्पोमधील ऋषिकेश अनंता पायगुडे रा.केडगाव चौफुला ता.दौंड हे अपघातात गंभीर जखमी झाले.

जखमींवर आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याचे समजते.

अपघातातील तिस-या घटनेत दौंड तालुक्यातील पाटस रस्त्यावर उंडवडी कडेपठारच्या हद्दीत पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान दारूच्या बाटल्या भरलेला ट्रक क्रमांक एम एच १२ एफ सी ६१५० पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. 

बारामती येथील मॅकडॉल कंपनीतून दारूच्या बाटल्या भरून जळगाव ,भुसावळकडे हा ट्रक निघाला होता. पहाटे साडेचार वाजता उंडवडी कडेपठार हद्दीत आल्यानंतर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने सातवा मैलनजिक एका धाब्याजवळ ट्रक पलटी झाला. 

या ट्रकमध्ये दारूचे ६५ लाख रूपये किंमतीचे ९५० बॉक्स होते.

दारू भरलेला मालट्रक उलटल्याची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी पिशव्या, गोणपाट भरून दारूच्या बाटल्या पळवून नेल्या. फुकटची दारू मिळाल्यामुळे ऐन दिवाळीत मद्यपींची मोठी चंगळ झाल्याची चर्चा परिसरात व्यक्त केली जात होती.

Share This

titwala-news

Advertisement