वेगवेगळ्या दोन ठिकाणी दोन तरूणांची आत्महत्या
वेगवेगळ्या दोन ठिकाणी दोन तरूणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ३० वर्षीय शेतमजुराने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
भैय्या राघो मोरे वय - ३० रा.खडकदेवळा ता.पाचोरा असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळूंखे यांनी केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे पुढील तपास करत आहेत.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील दुस-या घटनेत नारायण त्र्यंबक उबाळे वय -२७ वर्षे या तरूणाने घरासमोरील निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
नारायण उबाळे गॅरेज व्यवसायासह ट्रॅक्टर रोटावेटर चालविण्याचे काम करत होता.
बुधवारी रात्री ट्रॅक्टर रोटावेटरच्या कामासाठी दुस-याच्या शेतावर गेला होता. शेतातील काम आटोपून रात्री २ वाजण्याच्या घरी आला. सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना नारायण उबाळे या तरूणाने घराबाहेर येवून दाराला बाहेरून कडी लावली. समोरच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.