ग्रीनसोल ट्रेस मोड संस्थेच्या वतीने(ग्रीनसोल फाऊंडेशन)जि.प.केंद्र शाळा वेहेळे येथील विद्यार्थ्यांना चप्पल वाटपचा आगळा-वेगळा कार्यक्रम संपन्न.
विद्यादानाचे काम करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,शारीरिक, बौद्धिक पात्रता वाढावी म्हणुन शिक्षक वर्ग मेहनत घेत असतात,त्यांना पदस्पर्श करुन विद्यार्थी आशिर्वाद घेत असतात,त्याच विद्यार्थ्यांच्या पायातील चप्पल आगळवेगळ साधन आहे.अशावेळी शहरातील वेहेळे गावातील जि.प.केंद्र शाळेत ग्रीनसोल ट्रेस मोड संस्थेच्यावतीने(ग्रीनसोल फाऊंडेशन)येथील विद्यार्थी-विद्यार्थींनींना चप्पल वाटपचा आगळा-वेगळा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, समितीच्या सहखजिनदार सौ.श्रुती सतिश उरणकर,ग्लोबल मालवणीचे सदस्य प्रफुल्ल मोरे, सदस्या सौ.संध्या शंकर मोरे, सरपंच सौ.पल्लवी जितेंद्र पाटील,मुख्याध्यापिका सौ.ममता किरण निकावडे, सौ.जयश्री मनोहर ढाके यांच्या हस्ते मुलांना चप्पल वाटप करण्यात आले. तसेच सौ.चंचला पाटील,सौ.नमता पाटील, सौ.विजयलक्ष्मी सुर्यवंशी, श्री.निलकमल मेघश्याम,श्री.राजेंद्र सातपुते, सौ.माधुरी पाटील,संजना पाटील,सौ.छाया जाधव,सौ.स्नेहल तारी आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते. जयश्री ढाके व प्रफुल्ल मोरे यांच्या प्रयत्नाने हा चप्पल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ.जयश्री ढाके यांनी केले.या कार्यक्रमासाठी ग्रीनसोल फाऊंडेशन व त्यांचे सहकारी अंकीत कुमार व रुपाली मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय संविधान दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.