पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावाच्या शिवारात नाशिक - पुणे महामार्गावर सापळा लावून संशयित वाहन अडवून कंटेनरसह विदेशी मद्य व बिअरचे सुमारे ९९५ बॉक्स ,असा सुमारे ६९ लाख १३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने गुरूवार दि.११/११/२०२१ रोजी पहाटे ५ वाजता ही कारवाई केली.
एम एच ०४ एच डी ८८९२ या क्रमांकाचे संशयित वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्यात कापसाचे सुत असल्याचे सांगत त्याने एव्हीजी लॉजीस्टिक लि.दिल्ली या ट्रान्स्पोर्ट कंपनीची बिल्टी व खजुरीया टेक्स्टाईल मिल नवी मुंबई यांची इन्वाईस कॉपी दाखविली.
मात्र वाहनाची तपासणी करताना मागील बाजूच्या हौद्यात गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीच्या ७९९ खोक्यात १८० मिलीच्या ३८३५२ सिलबंद बाटल्या , ९६ खोक्यात किंग फिशर स्ट्रॉंग बिअरच्या ५०० मिलीच्या २३०४ सिलबंद बाटल्या असा अवैध मद्यसाठा आढळला.
पथकाने कंटेनरसह सुमारे ६९ लाख १३ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक सुर्यनारायण रामचंद्र शिरसाठ वय -३५ रा.सम्राट अशोकनगर विलेपार्ले पूर्व सहार पी अँड टी कॉलनी मुंबई याचे विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ ई ८१,८३,९०, १०३, व १०८ तसेच भारतीय दंड संहिता, ४२० चे कलम १८६० ,४६५,४६८ व ४७१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड पुढील तपास करीत आहेत.