व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याचा बाजारभावाबाबतचा निर्णय स्वागतार्ह
ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे
शिरूर:-
सन २०२४-२५ गळीत हंगामात गाळपास गेलेल्या,कारखान्याकडे आलेल्या ऊसाला ३ हजार रूपये प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव देणार असल्याचे व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी नुकतेच जाहीर केले आहे. कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचे कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी स्वागत केले आहे.
कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी जाहीर केलेल्या ऊस दराच्या निर्णयाबाबत "टिटवाळा न्यूज"ला प्रतिक्रिया देताना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी म्हटले आहे, गेल्या वर्षी ऊसाला कमी बाजारभाव मिळाल्याने शेतकरी खाजगीत नाराजी व्यक्त करत होते.
शेतीची नांगरणी, रोटरणी, ऊस लागवडीसाठी स-या पाडणे ,ऊस बेणे, ऊसाची रोपे, ऊसाचे तयार डोळे, ऊस लागवडीसाठी खते, खुरपणी , तणनाशक इ.शेतीमशागतीचे दर वाढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी जवळपासच्या कारखान्यांच्या बरोबरीने जाहीर केलेला ऊसाला ३ हजार रूपये प्रतिटन बाजारभाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने स्वागतार्ह, दिलासादायक आहे.
शासनाने जाहीर केलेल्या एफ आर पी प्रमाणे बाजारभाव दिल्यास व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याला ऊस देणा-या शेतक-यांना ऊस लागवडीसाठी अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल असेही मत कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )