• Total Visitor ( 704217 )
News photo

जेष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे पुण्यात निधन 

Raju tapal May 24, 2025 145

जेष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे पुण्यात निधन 



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- जेष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी ( दि.२३ मे ) रात्री निधन झाले.

भारती गोसावी यांचा जन्म २२ जून १९४१ रोजी झाला. भारती गोसावी यांचे माहेरचे नाव दमयंती कुमठेकर होते.नाट्य अभिनेते बाळ गोसावी यांच्या त्या पत्नी तर राजा गोसावी यांच्या त्या वहिनी होत्या.

रंगभूमीवर त्यांनी तब्बल ५८ वर्षे अधिराज्य केले असून ८० मराठी नाटकांमधून १२५ वर भूमिका केल्या.

१९५८ मध्ये त्यांनी सौभद्र नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केले.पदार्पणातच त्यांना छोटा गंधर्व यांच्या बरोबर काम करायला मिळाले.संशयकल्लोळ, मानापमान या नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.

काशिनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर आदी दिग्गज नायकांबरोबर तुझे आहे तुजपाशी मध्ये गीताची भूमिका केली. 

अखिल भारतीय नाट्य परिषद,, मनोरंजन पुणे, भरत नाट्य संशोधन मंडळ या संस्थांच्या वतीने २०१६ मध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.

अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेचा २०१५ सालचा चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.

अति शहाणी -योजना,कुर्यात पुन्हा. टिंगलम् -सूनबाई ,कुणी गोविंद घ्या -प्रतिभा, जळो जिणे लाजिरवाणे -सुशीला, तुझे आहे तुजपाशी - गीता, तु वेडा कुंभार - वंचा, दोघांत एक - स्मिता, प्रेमा तुझा रंग कसा - बब्बड, वाहतो ही दुर्वांची जुडी -ताई, मानापमान, संशयकल्लोळ -कृत्तिका ,सुंदर मी होणार - बेबीराजे ,सौभद्र -रूक्मिणी, लग्नाची बेडी -अरूणा, यामिनी, रश्मी,गार्गी आदी त्यांच्या भूमिका,पात्रे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या ठरल्या.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर जि.पुणे)


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026