वीज कामगार काँग्रेस इंन्टक केडगाव विभागीय कार्यकर्ता मेळावा केडगाव येथे संपन्न
केडगाव विभागीय कार्यालयाच्या संघटना नाम फलकाचे केडगाव येथे उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे इंटक संघटनेचे सचिव गजानन अवचट यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते .
त्यानंतर विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गजानन अवचट होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश देवकर संघटक महाराष्ट्र राज्य , विलास चौधर महापारेषण महाराष्ट्र राज्य ,मनोज बापू कदम बारामती परिमंडळ अध्यक्ष,अतुल वाघमोडे सचिव बारामती मंडळ,वणवे बारामती डिव्हिजन सचिव, दत्तात्रय जगताप चेअरमन छत्रपती पतसंस्था ,
गवळी सचिव केडगाव ,
महादेव मोरे शिक्रापूर उपविभाग अध्यक्ष ,झगडे ,शिंदे, गावडे,सचिन शिंदे ,हनुमंत लोंढे ,राजेंद्र उर्मुडे ,दत्ता कांबळे ,शिवाजी शिंदे कार्यक्रमास उपस्थित होते.
महिला संघटक निशा कापरे व रुपाली ढोबळे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
मान्यवरांची यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात सर्व कार्यकर्त्यांना गजानन अवचट यांनी मार्गदर्शन केले.
सुनील हॅलोडे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या अडचणी आपल्या भाषणात मांडल्या
कार्यक्रमाचे नियोजन केडगाव अध्यक्ष कुंभार यांनी केले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मांनले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटक मंडळ संघटक रामेश्वर ढाकणे यांनी केले