शिरूर - निमोणे रस्त्यावरील कुकडी कॉलनीच्या मागील बाजूस कंपाऊंड शेजारी रस्त्यालगत असलेल्या विद्यूतरोहित्रामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना धोका होण्याची शक्यता आहे.
शिरूर - निमोणे रस्त्यालगत कुकडी कॉलनी असून चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय,विद्याधाम प्रशाला विद्यालय तसेच दिवाणी ,फौजदारी न्यायालयही रस्त्यापासून जवळच आहे आहे. या रस्त्यावरून न्यायालयात जाणारे येणारे नागरिक, चांदमल ताराचंद ब़ोरा महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक, गोलेगाव, तरडोबाचीवाडी, मोटेवाडी निमोणे कडे जाणारे येणारे प्रवासी,वाहनचालक तसेच शिरूरमधील नागरिक या रस्त्यावरून प्रवास करत असतात .
शिरूर शहरातील कुकडी कॉलनीच्या कंपाऊंड शेजारी असलेले विद्यूतरोहित्र रस्त्यालगत उभारलेले आहे .तसेच या विद्यूतरोहित्रावरून रस्ता क्रॉस करून गेलेल्या वीजवाहक ताराही अतिशय कमी उंचीवरून गेलेल्या आहेत.
या रस्त्यावरून प्रवास करणा-या वाहनचालक व प्रवाशांना विद्यूतरोहित्रापासून होणारा धोका टाळण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या विद्यूतरोहित्राची जागा बदलणे अतिशय गरजेचे आहे.