विजेचा शॉक बसून दोघांचा मृत्यू ; मावळ तालुक्यातील उकसान पठारावरील घटना
------------------
मावळ तालुक्यातील उकसान पठारावरील मेंढीमाळात महावितरणच्या विजेचा शॉक बसून शिरदे येथील दोघांचा मृत्यू झाला.
अविनाश खेमाजी बगाड , रविंद्र सिताराम बगाड दोघेही रा.शिरदे ता.मावळ असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.
लहू भरत बगाड रा.शिरदे यांनी या घटनेची खबर पोलीसांना दिली.
लहू बगाड, जयदास बगाड, समीर बगाड,अजय बगाड , साईनाथ बगाड, अविनाश बगाड, रविंद्र बगाड हे सातजण बैल शोधायला सोमवारी दि.४ ऑक्टोबरला रात्री उकसान पठार मेंढीमाळावर गेले असता विजेचा शॉक,करंट बसून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अविनाश बगाड वडेश्वरच्या आश्रमशाळेत दहावीत शिकत होता.
कामशेत पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
कामशेत पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.