• Total Visitor ( 85024 )

विळ्याने गळा चिरून माजी सैनिकाचा नांद्रे ता.मिरज येथे खून

Raju Tapal November 09, 2021 43

माजी सैनिकाचा विळ्याने गळा चिरून खून करण्याची घटना मिरज तालुक्यातील नांद्रे येथे रविवारी ७ नोव्हेंबरला  रात्री घडली.

आप्पासाहेब बाळकृष्ण कुरणे वय - ७५ असे खून करण्यात आलेल्या माजी सैनिकाचे  नाव असून याप्रकरणी सुरज रामचंद्र कुरणे वय - २९, संजय भुपाल बनसोडे वय - ४२ रा.दोघेही नांद्रे अशी ग्रामीण पोलीसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

आप्पासाहेब कुरणे यांचा मुलगा बाळू कुरणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.

दोघा संशयितांना न्यायालयाने शूक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

बाळू याचे आजोळ तुंग असून तो त्या ठिकाणी राहातो. आप्पासाहेब हे कधी तुंग येथे तर  कधी नांद्रे येथे राहात होते.

संशयित सुरज कुरणे हा त्यांचा चुलत चुलत भाऊ लागतो. संजय बनसोडे हा  सुरजच्या ओळखीचा आहे. 

कुरणे निवृत्ती वेतन जमा झाल्यानंतर संशयित दोघांना दारू देत असत.रविवारी  दि.७ नोव्हेंबरला रात्री तिघे दारू पीत बसले होते. त्यावेळी दारूच्या पैशांवरून कुरणे यांच्याशी दोघांनी वाद घालण्यास सुरूवात केली. वाद टोकाला गेल्यानंतर दोन संशयितांनी मद्यधुंद अवस्थेत आप्पासाहेब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

एकाने काठीने डोक्यात मारहाण केली.

त्यावेळी कुरणे जमिनीवर पडले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुरणे यांना पाहून संशयितांनी विळ्याने गळ्यावर वर्मी वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कुरणे यांच्या अंगावर पांघरूण टाकून दोघेही संशयित पळून गेले. 

ही माहिती मिळाल्यानंतर आप्पासाहेब कुरणे यांचे नातेवाईक घटनास्थळी गेले.त्यावेळी आप्पासाहेब मृतावस्थेत दिसून आले. तात्काळ ग्रामीण पोलीसांना कळविण्यात आले. 

पोलीस उपअधिक्षक अजित टिके, निरिक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पथक घटनास्थळी गेले. दोन संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. दोघांनीही खुनाची कबुली दिली. सुरज कुरणे याच्याविरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात या पूर्वीचा मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.

Share This

titwala-news

Advertisement