शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रूक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लिमिटेड कारखान्याच्या वतीने दिपावलीनिमित्त सवलतीच्या २० रूपये प्रतिकिलो दराने साखर वाटप धोरण जाहीर करण्यात आलेले आहे.
दहा हजार रूपयांचे शेअर्स असणा-यांना ४० किलो साखर, पाच हजार रूपयांचे शेअर्स असणा-यांना २० किलो साखर, दहा हजार रूपयांचे शेअर्स व ऊस पुरवठादारांना ६० किलो साखर, पाच हजार रूपयांचे शेअर्स व ऊस पुरवठादारांना ४० किलो साखर, फक्त ऊस पुरवठादारांना हंगाम २०२०- २०२१ साखर ३० किलो याप्रमाणे सर्व सभासद,ऊस पुरवठादार शेतकरी यांना दिपावलीनिमित्त साखर वाटप केली जाणार आहे.
गट :- मांडवगण फराटा,कोंढापुरी, अष्टापूर , दि. ७/१०/२०२१ ते ८/१०/२०२१
गट :- वडगाव रासाई, कोरेगाव भीमा,करंदी १, तळेगाव ढमढेरे १ दि. ७/१०/२०२१ ते ९/१०/२०२१
गट :- जातेगाव बुद्रूक ,न्हावरे दि.९/१०/२०२१ ते ११/१०/२०२१
गट :- कोलवडी
दि.९/१०/२०२१ ते १०/१०/२०२१
गट :- निमोणे, मलकळ, करंदी २
दिनांक १०/१०/२०२१ ते ११/१०/२०२१
गट :- तळेगाव ढमढेरे २
दि. १०/१०/२०२१ ते १२/१०/२०२१
गट :- पिंपळे धुमाळ
दि.११/१०/२०२१ ते १३/१०/२०२१
गट :- शेलपिंपळगाव, शिरूर
दि. १२/१०/२०२१ ते १३/१०/२०२१
गट :- राहू
दि.१२/१०/२०२१ ते १२/१०/२०२१
गट :- पुणे
दि.१३/१०/२०२१ ते १४/१०/२०२१
सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत साखरेचे वाटप केले जाणार असून त्याप्रमाणे त्या तारखेमध्ये साखर घेवून जाण्याचे आवाहन व्यंकटेशकृपा शुगर मिल्स कारखान्याच्या वतीने करण्यात आलेले आहे.