• Total Visitor ( 368977 )
News photo

भविष्यकाळात आपल्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबवू 

Raju tapal October 24, 2025 63

भविष्यकाळात आपल्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबवू 



 सरपंच रमेशराव गडदे‌ यांचे सुतोवाच 

            

भविष्यकाळात आम्ही पदावर असू किंवा नसू सालाबादप्रमाणे आम्ही तुम्हाला विसरणार नाही, भविष्यकाळात आपल्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबवू असे सुतोवाच  शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे‌ यांनी शिक्रापूर येथे केले.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषाताई गडदे ,सरपंच रमेशराव गडदे‌ यांच्या वतीने शिक्रापूर परिसरातील पत्रकारांची दिवाळी गोड होण्यासाठी मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच रमेशराव गडदे बोलत होते.

 पत्रकार प्रा.संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषाताई गडदे, हार्दिक रमेशराव गडदे,मेघा तांबे, वैशाली गायकवाड, वंदना रामगुडे, पंढरीनाथ गायकवाड, अंकूश घारे,सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे,मंदार तकटे‌ , सर्वश्री पत्रकार प्रा.नागनाथ शिंगाडे, टिटवाळा न्यूज चे पत्रकार विजय ढमढेरे, पत्रकार उदयकांत ब्राम्हणे, पत्रकार एन बी मुल्ला , प्रा. प्रविण जगताप, घनश्याम तोडकर,शेरखान शेख,  कवी आकाश भोरडे, निलेश जगताप, राजाराम गायकवाड, अंकूश विनायक ढमढेरे,महम्मदभाई तांबोळी, सोमनाथ भुजबळ कार्यक्रमास उपस्थित होते.

 पत्रकार नागनाथ शिंगाडे या वेळी मनोगतात बोलताना म्हणाले, फाउंडेशनच्या नावातच कर्तव्य आहे. डाॅ‌.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये मुलभूत हक्क आणि मुलभूत कर्तव्ये दिलेली आहेत.हक्कानूसार कर्तव्य करायचं हे कर्तव्य फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे. लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाला सांभाळायचं काम खरं तर कुठल्या का माध्यमातून होईना सरपंच रमेशराव गडदे‌ यांनी केले आहे.सरपंच रमेशराव गडदे‌ यांनी गेल्या ५ वर्षात केलेले काम वाखाणण्यासारखे आहे.

पत्रकार घनश्याम तोडकर आपल्या मनोगतात म्हणाले, समाजाला उपक्रमांची गरज आहे. मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार करतीलच.येथून पुढे पत्रकारांचा सहभाग लागला तर आम्हाला अवश्य सांगा सहकार्य करू.आम्हाला काही यथाशक्ती मदत करता येईल ती करू.

पत्रकार उदयकांत ब्राम्हणे यावेळी प्रास्ताविकात बोलताना म्हणाले, कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून सरपंच रमेशराव गडदे‌ ‌, कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक मनिषाताई गडदे उत्कृष्ट काम करताहेत.आपण सगळे मिळून त्यांना सहकार्य करत असतो याची जाणीव ठेवून त्यांनी आज आपल्या सगळ्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा मनोसंकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. 

हार्दिक रमेशराव गडदे‌  यांनी आभार मानले.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement