• Total Visitor ( 133615 )

माडखोल येथे वीज खांबावरून पडून वायरमनचा मृत्यू

Raju tapal December 09, 2024 34

माडखोल येथे वीज खांबावरून पडून वायरमनचा मृत्यू

सावंतवाडी:-माडखोल खळणेवाडी येथे ११ केव्ही विद्युत खांबावर चढून इन्सुलेटर बदलण्याचे काम करत असताना शॉक लागून खाली पडल्याने वायरमनचा मृत्यू झाला.रूपेश अनंत डांगी (वय ३०, रा. महादेवाचे केरवडे, कुडाळ ) असे त्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.पोलवरून खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

माडखोल येथे विद्युत पोलच काम करण्यासाठी तो युवक गेला होता. कंत्राटदाराकडून पोल उभारण्याच कंत्राट घेण्यात आलं होतं. मयत युवक हा कंत्राटदाराचा कामगार होता. इन्सुलेटर बदलण्यासाठी तो पोलवर चढला होता. यावेळी अचानकपणे शॉक लागल्यानं तो जमीनीवर कोसळून गंभीर जखमी झाला. तेथे उपस्थित सहकारी कामगारांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू होते. तर अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे त्याला हलविण्यात येत होते. मात्र, उपचार सुरू असतानाच प्रकृती गंभीर होऊन त्याचे दुःखद निधन झालं.या घटनेची माहिती मिळताच पोलिस, महावितरण अधिकारी, ठेकेदार यांनी रूग्णालयात धाव घेतली होती. त्याच्या निधनाने डांगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.
 

Share This

titwala-news

Advertisement