बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जांबूत येथील महिलेचा मृत्यू
शिक्रापूर (प्रतिनिधी):- बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिरूर तालुक्यातील जांबूत येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि.२२ आॅक्टोबरला पहाटेच्या सुमारास घडली.भागूबाई रंगनाथ जाधव वय -६० वर्षे असे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून त्या बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर लघूशंकेसाठी गेल्या होत्या.बिबट्याने त्यांना घराजवळून जवळपास ५०० फूट अंतरावर असलेल्या ऊसाच्या शेतात ओढून नेऊन ठार मारले असे समजले.