तळेगाव ढमढेरे येथील गुजर प्रशालेत महिला दिन उत्साहात
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीतील प्रतिभावान महिलांच्या प्रतिमांचे पूजन यावेळी करण्यात आले.
यामध्ये राजमाता जिजाऊ ,अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका व महिला दिनाच्या प्रशालेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या रूपाली ढमढेरे यांनी केले. प्रशालेच्या विद्यार्थिनी आराध्या सिंह, अस्मिता पाटील, अनुष्का गुप्ता, देविका तोडकर ,आर्या बोरावके, तनवी खांडे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे महत्त्व व महिला दिन साजरा का करावा हे विद्यार्थ्यांना सांगितले. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी प्रतिभावान महिलांचे वेशभूषा परिधान करून त्यांच्याबद्दलही माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचप्रमाणे प्रशालेच्या नंदा सातपुते यांनी आपल्या मनोगतातून आजच्या महिलेची भूमिका कशी असावी हे विद्यार्थिनींना पटवून दिले. प्रशालेच्या हर्षाली भोईटे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांविषयी काव्यवाचन प्रशालेत केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या हर्षाली भोईटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सोनाली शेळके यांनी मानले
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे ,शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर ,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे ,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे ,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे)