ग्रामपंचायत नडगाव- दानबाव यांच्या वतीने महिला मेळावा संपन्न.
ग्रुप ग्रामपंचायत नडगाव-दानबाव यांच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी महिला मेळावा ग्रामपंचायत कार्यालया जवळ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच प्रमिला लोणे यांच्या हस्ते करून महिला मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. माझी वसुंधरा,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असुन ओला कचरा व सुका कचरऱ्याचे वर्गीकरण करणे, वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये कसे ठेवायाची याची माहिती महिलांना देण्यात आली. तसेच प्रत्येकी कुंटुबाला दोन डस्टबिन डब्बे देण्यात आले. निळा डस्टबीन मध्ये सुका कचरा व हिरव्या डस्टबिन मध्ये ओला कचरा ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या, कचऱ्याचे वर्गीकरण याची सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका प्रमुख वसंत लोणे, सरपंच प्रमिला प्रकाश लोणे, सदस्य अरुणा चौधरी, ग्रामसेवक प्रसेन गोतारणे, नडगाव गावचे पोलीस पाटील जगदीश लोणे, आदेश चौधरी,प्रकाश लोणे, कर्मचारी रमेश भोईर, यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.