मांडा ते वासुंद्री या मुख्य रस्त्याचे काम संथ गतीने
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मांडा ते वासुंद्री या मुख्य रस्त्याचा चालु असलेल्या काँक्रीट रस्त्याचे काम आर ई इन्फ्रा संबंधीत ठेकेदार यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षा व शालेय मुलांना येजा करणाऱ्या बस व इतर सर्व नागरीकांना येण्या जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसताना सदर रस्त्याचे काम संथ गतीने चालु आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. याबाबत उधोजक साईनाथ वसंतदादा भोय,माजी जिल्हा परिषद सदस्य रविच ताडल (उदयोगपती) या लक्ष्मण भोर,जयराम भोय आरपीआय मांडा टिटवाळा युवक अध्यक्ष सन्नी जाधव,प्रतिक क्षिरसागर, पप्या भोय,मोहन डमाले,अन्सार मन्यार, किरण पाटील,नरेंद्र बुधाजी पाटील इत्यादी कार्यकर्त्यांसह सदर रस्त्याच्या कामाची पाहणी करून आढावा घेऊन संबंधीत ठेकेदावर जलद गतीने कारवाई व्हावी अशी ग्रामस्थानी महानगरपालिके कडे मागणी केली आहे. तसेच सदरील ठेकेदारावर कारवाई न झाल्यास महानगर पालिकेच्या आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांना संबंधीत शिष्टमंडल भेट घेणार आहेत.