यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पास आग
हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पास आग लागल्याची घटना घडली.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सन २०११ पासून बंद अवस्थेत असून लागलेल्या आगीत नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.
सोमवारी सायंकाळी कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पास आग लागली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी माजी संचालक पांडूरंग काळे यांना कल्पना दिली. त्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली.
थेऊर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी ,एस पी ओ, तसेच कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले.
यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाल्यापासून याकडे कोणाचेही लक्ष नाही.