शिरूर येथील हुडको वसाहतीतील बांधकाम युवा व्यावसायिक आदित्य संदीप चोपडा याचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ शिरूर शहर बंद ठेवून व्यापा-यांनी कॅन्डल मोर्चा काढला.
शिरूर येथील युवा बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडा हा नारायणगव्हाण येथील नवलेमळा येथे रस्त्याचे काम करत असताना त्याचे अपहरण करून तीन दिवसांनी २९ सप्टेंबरला विहीरीमध्ये आदित्य चोपडा याचा मृतदेह आढळून आला होता.
त्यानंतर नारायणगव्हाण येथे पुणे - नगर महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.
या खुनाची चौकशी व्हावी, आरोपींना त्वरीत अटक करावी ,जलदगती न्यायालयात ही केस चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी शिरूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी शिरूर येथे कॅन्डेल मोर्चा काढून केली.
शिरूरचे आमदार ऍड अशोक पवार ,उद्योजक प्रकाश धारिवाल, संघपती भरत चोरडिया, सतीश धाडिवाल, बाजार समितीचे उपसभापती प्रवीण चोरडिया, नगरसेवक,नगरसेविका, महिला संघटना, सर्वापक्षीय कार्यकर्ते, सामाजिक, क्षैक्षणिक क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले