सावित्रीबाई फुले स्मृतिदिन ,महिलादिनानिमित्त कोयाळी गावठाण ( ता.शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
------------------
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन ,महिला दिनानिमित्त कोयाळी गावठाण ता.शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत ६९ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजेत्या महिलांना मिक्सर ग्राईंडर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक केटल ( किटली ) अशी बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेच्या आयोजक ,शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्या पुजाताई भुजबळ यांनी ही माहिती दिली.
सौ.चंद्रकला भुजबळ, सौ.रेखा बांदल, सौ.वर्षा गवारी या महिला प्रमुखांसहीत २०० महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.
सौ. विशाखा फुलारी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे.