• Total Visitor ( 84803 )

माउलीच्या सोहळ्यात पहिले गोल रिंगण उत्साहात

Raju Tapal June 25, 2023 83

 

*माउलीच्या सोहळ्यात पहिले गोल रिंगण उत्साहात*

 

*शनिवार 24 जून रोजी माउलीच्या पालखी सोहळ्यात मांडवी ओढा ते माळशिरस या दरम्यान सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पार पडले. पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून कालपर्यंतचा वारकरी मंडळींचा हा प्रवास कडक उन्हातच झाला. काल झालेल्या पावसामुळे गोल रिंगणाच्या वेळी सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता. चोपदारांनी रिंगण लावल्यानंतर मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले वारकरी उभे होते. चोपदारांचे कौशल्य व वारकर्‍यांची शिस्त याठिकाणी दिसून आली.*

 

*रिंगणाच्या वेळी आलेल्या पावसाने तरुण वारकरी मंडळींचा आनंद द्विगुणित केला. टाळ-मृदंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पावल्या करीत वारकरी नाचत होते.रिंगण संपताच रिंगणाच्या परिघातच पावल्या, मैदानी खेळ, हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, हे मैदानी खेळ टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू होते.*

 

*आज माळशिरस ते वेळापूर या प्रवासात खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण व 26 जून रोजी वेळापूर ते भंडीशेगाव या दरम्यान ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल. तसेच माउली व संत सोपान देवांच्या बंधुभेटीचा सोहळा सुद्धा तोंडले-बोन्डले ते भंडीशेगाव या दरम्यान होणार आहे. श्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात शनिवारी सकाळी सराटी येथे पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले व दुपारी अकलूज येथे तिसरे गोल रिंगण पार पडले.*

Share This

titwala-news

Advertisement