• Total Visitor ( 429247 )
News photo

कोंढापुरी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Raju tapal April 11, 2025 64

कोंढापुरी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 



शिरूर :- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गावचे कुलदैवत श्री.खंडेराया उत्सवानिमित्त जयमल्हार यात्रा उत्सव समितीच्या वतीने शनिवार दि.१२ एप्रिल, रविवार दि.१३ एप्रिल २०२५ असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गावचे कुलदैवत श्री.खंडेराया देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाणार आहे.

शनिवार दि‌.१२ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

पहाटे ५ वाजता मल्हार गडावरील श्री.खंडेराया मुख्य मंदीरात अभिषेक करण्यात येणार आहे.

सकाळी साडेसहा वाजता पुणे - अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या श्री.खंडेरायाच्या छोट्याशा मंदीरात श्री.खंडेराया पादुकांचा अभिषेक,सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत ग्रामस्थांच्या विविध वाड्या़ंचे श्री.खंडेरायास दंडवंताचा कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत बगाडाची‌ भव्य दिव्य मिरवणूक, सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मानाची काठी,खंडेराया पालखीची भव्य दिव्य मिरवणूक, सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा,रात्री ११ वाजता मल्हार गडावरील श्री.खंडेरायाच्या मुख्य मंदीरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम, रविवार दि.१३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत नामांकित मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा जंगी आखाडा, सायंकाळी ६ वाजता कोंढापुरी गावच्या पंचक्रोशीतील शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातील नामांकित मल्लांचा आदर सन्मान केला जाणार आहे.रात्री ७ ते १० यावेळेत आॅल दि बेस्ट अप्सरा चंद्रमुखी आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री.खंडेराया उत्सवानिमित्त करण्यात आले आहे.

लहान, मोठ्यांसाठी दोन दिवस फन सिटी, विविध प्रकारचे पाळणे लावण्याचे नियोजन जयमल्हार उत्सव समितीने केले असून यात्रेनिमित्त साज-या होणा-या सर्व कार्यक्रमांमध्ये, मिरवणूकीमध्ये सहभागी होवून देणगी स्वरुपात आर्थिक मदत करून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन जयमल्हार उत्सव समितीचे मार्गदर्शक स्वप्निलभैय्या अरूणराव गायकवाड, जयमल्हार उत्सव समितीचे अध्यक्ष माणिकराव वसंतराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रकाशराव हरिभाऊ घाडगे,सचिव अमरदादा अशोकराव गायकवाड, खजिनदार सुधीरराव शामराव गायकवाड यांनी केले आहे.

दरम्यान, कोंढापुरी येथील जयमल्हार यात्रा उत्सवानिमित्त हनुमान मंदिरासमोरील पटांगणावर मंडप उभारणीचे काम चालू करण्यात आले आहे. गावचे कुलदैवत ख़डेराया मंदीर, हनुमान मंदिर तसेच गावांतर्गत रस्ते, खंडेराया मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्यूतरोषणाईचेही काम चालू करण्यात आलेले असून सफाई कर्मचा-यांकडून गावांतर्गत रस्ते स्वच्छ करण्याचेही काम चालू करण्यात आले आहे.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर जि.पुणे)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement