• Total Visitor ( 728369 )
News photo

डोंबिवलीतून ४० वर्षीय राजा पाल बेपत्ता...

Raju Tapal publisher October 15, 2026 32

डोंबिवलीतून ४० वर्षीय राजा पाल बेपत्ता... 



अपहरणाचा संशय व्यक्त करत भावाची पोलिसांत तक्रार...



धर्मेंद्र पाल.

डोंबिवली:- डोंबिवली परिसरातून ४० वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, संबंधित व्यक्तीचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या भावाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून,पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत तपास सुरू केला आहे.पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार,राजा विश्वनाथ पाल (वय ४० वर्षे) हे बेपत्ता झाले आहेत. त्यांचे भाऊ दिनेश विश्वनाथ पाल (वय ३१ वर्षे) यांनी यासंदर्भात पोलिसांकडे आपली कैफियत मांडली आहे.तक्रारीत नमूद केल्यानुसार,बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असावे,असा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून,बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणे आणि घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करणे या दृष्टीने तपास सुरू आहे.पोलिस तपासातून बेपत्ता व्यक्तीबाबत काय माहिती समोर येते आणि या घटनेमागील नेमके सत्य काय आहे,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement