कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 9/आय प्रभागात अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई!
Raju Tapal
October 15, 2022
27
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 9/आय प्रभागात अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !
महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार विभागीय उपायुक्त डॉ.सुधाकर जगताप व परिमंडळ -2 च्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 9/आय प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर ठाकूर यांनी नांदिवली तलावा जवळ असलेल्या शासकीय जमिनीवरील 10 रुम, 2 दुकान गाळे, 9 गोडाऊन व 6 जोत्याच्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई केली तसेच मौजे वसार येथिल सुनील राणे यांचे चाळीतील 7 रुम व 2 दुकान गाळ्यांच्या अनधिकृत बांधकामावरही निष्कासनाची धडक कारवाई केली. सदर कारवाई महापालिकेचे पोलीस कर्मचारी, अतिक्रमण निमुर्लन विभागाचे कर्मचारी आणि 1 जेसीबी च्या सहाय्याने करण्यात आली.
Share This