• Total Visitor ( 692882 )
News photo

दहीहंडीच्या थरारात १० गोविंदा जखमी

Raju Tapal publisher September 05, 2026 27

दहीहंडीच्या थरारात १० गोविंदा जखमी



छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल





दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या अपघातांमध्ये एकूण १० गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल ४ गोविंदे :

जतीन पाटील (३०) – पाठ व मानेला दुखापत

जतीन केशरी (३१) – पाठीला दुखापत

नंदकिशोर शेलार (६५) – डोक्याला दुखापत

निखिल यादव (३५) – डाव्या हाताला किरकोळ दुखापत

जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल ६ गोविंदे :

हर्ष शर्मा (२१) – पाठीला किरकोळ दुखापत

गिरीश चिपकर (२३) – किरकोळ दुखापत

ओंकार शिंदे (२५) – उजव्या पायाला फ्रॅक्चर

अमन यादव (२१) – उजव्या हाताला किरकोळ दुखापत

आयुष गुप्ता (१९) – पाठीला किरकोळ दुखापत

अमेय नाईक (२३) – उजव्या हाताला किरकोळ दुखापत

दहीहंडीच्या उत्साहात गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचले जात असताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026