• Total Visitor ( 84583 )

107 बलात्कारांच्या घटनेने हादरले कल्याण डोंबिवली शहर...

Raju Tapal January 01, 2023 116

107 बलात्कारांच्या घटनेने हादरले कल्याण डोंबिवली शहर

कल्याण:-वर्षभरात 107 बालात्काराच्या घटनेने कल्याण डोंबिवली शहर हादरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी बलात्काराचे 84 गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा 23 ने वाढ झाली असून 107 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.
दिल्लीतील निर्भया हत्याकांडनंतर देशासह राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत अंमलबजाणीसाठी कठोर कायद्यासह अनेक पथके स्थापन करण्यात आली आहे. मात्र तरीही महिलांना "पावला पावलावर असते भय, अन सरकारनं म्हणे केली संरक्षणाचीसोय' असा अनुभव कल्याण डोंबिवली शहरात पाहवयास मिळाला आहे. खळबळजनक बाबा म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ  झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे 84 गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा 23 ने वाढ झाली असून 107 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून गेल्यावर्षी 18 वर्षाखालील 48 गुन्ह्यांची नोंद झाली होती. तिच यंदा 58 झाली आहे. तर 18 वर्षावरील महिलांवर अत्याचार मध्ये गेल्यावर्षी 36 तर यंदा 49 गुन्हे नोंद झाल्याचे समोर आले आहे.

विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ  

100 टक्के गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी केला असला तरी महिला कल्याण डोंबिवली शहरात सुरक्षित नसल्याचे यावरून दिसून येते. तर विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ झाली असून गेल्यावर्षी 120 गुन्हे नोंद होते, त्यातील 111 गुन्ह्यांची उकल झाली होती. यंदा 180 विनयभंगाचे गुन्हे दाखल असून 174 गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये 18 वर्षावरील गुन्हे जास्त आहेत.

अपहरणाच्या घटनां 224 च्या घरात -

अपहरणाच्या घटनां मध्ये देखील यंदा वाढ झाली आहे. मागील वर्षी 154 घटना अपहरणाच्या नोंद झाल्या होत्या यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा 224 च्या घरात गेला आहे. 18 खालील मुलींचे अपहरणमध्ये 145 घटना नोंद झाल्या आहेत, तर मुलांंमध्ये 73 घटना नोंद आहेत. 18 वर्षावरील मुली 1 तर मुलांच्या 5 घटनांची नोंद आहे. या गुन्ह्यांची देखील 80 टक्के उकल पोलिसांनी केली आहे.

संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या 100 गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत 

कल्याण डोंबिवली शहरात वाढती गुन्हेगारी पाहता, यावर्षी पोलिसांनी कल्याण डोंबिवलीतील 12 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या सराईत १०० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये खेमा गँग, कल्याण पूर्व अभिजित कुडुलकर गॅंग, डोंबिवलीतील वांग्या गॅंग व सोनसाखळी चोरी करणाऱ्या 8 इराणी गॅंगचा समावेश आहे.

पोलिसांच्या आरोग्यावर ताण -

कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत 8 पोलीस ठाणे आहेत. परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा पोलिसांनी अहोरात्र प्रयत्न केला आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या विचारात घेता या पोलिस ठाण्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.परिणामी गुन्ह्यांचा तपास, नाकाबंदी, व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न, 12 ते 14 तासांची ड्यूटी,रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा मिळत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत नाही. अशा ताण-तणावाने पोलिसांचे रोजचं जगणंच व्यापलेलं आहे. ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे पोलिसांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

3 हजारच्या आसपास गुन्हे दाखल -

कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत 2022 मध्ये अखेरपर्यंत जवळपास 3 हजारच्या आसपास गुन्हे पोलिस स्थानकात दाखल झाले आहेत. पोलिसांची उल्लेनीय कामगिरी आणि सीसीटिव्हीच्या स्मार्टनेसपणामुळे शहरातील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण हे 80 टक्के आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे 100 टक्के उघडकीस आले आहेत. कल्याण-डोंबिवलीत यंदाच्या वर्षी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 80 टक्के महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण पाहता बलात्कार, विनयभंग यांसारखे गुन्हे देखील 100 टक्के उघडकीस आले आहेत.12 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली गेली आहे, तर एमपीडी अंतर्गत नऊ जणांवर कारवाई केली आहे. तर 100 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

सीसीटीव्हीचा स्मार्टनेस आला उपयोगी -
कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरातील शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सीसीटिव्ही बसविले आहेत. तसेच अनेक दुकाने आणि सोसायटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावण्यात आले आहे . शहरात सुमारे 1 हजारांच्या वर सीसीटिव्ही लावल्यामुळे एखादा गुन्हा घडला .तर त्या आरोपीला पकडण्यामध्ये सीसीटीव्ही हा मोठा दुवा ठरत असल्याने पोलिसांनी सांगितले.

दाखल तसेच उघड झालेले गुन्हे -

2022 2021

खून 18 18 19 18

खूनाचा प्रयत्न 22 22 17 17

दरोडा 1 1 0 0 

जबरी चोरी 140 117 101 66

घरफोडी 154 93 170 67

चोरी 616 311 611 242

वाहन चोरी 381 176 390 147

दुखापत 399 383 366 359

बलात्कार 107 107 84 83

विनयभंग 180 174 120 111

Share This

titwala-news

Advertisement