12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Raju Tapal
October 17, 2022
124
12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बारा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याण मध्ये समोर आली होती.. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली .या प्रकरणी पोलिसांनी संजय बनसोडे या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
सदर १२ वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण परिसरात राहते… काल ही मुलगी आपल्या घराच्या परिसरात खेळत असताना संजय बनसोडे या नराधमाने तिला काही कारणाने घरात बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला… संध्याकाळी मुलीला पोटात दुखू लागल्याने तिने याबाबत आपल्या कुटुंबाला घडला प्रकार सांगितला.. पीडित मुलीच्या कुटुंबाने थेट बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी संजय बनसोडे विरोधात गुन्हा दाखल करत नराधम संजय बनसोडे याला बेड्या ठोकल्या आहेत.
संजय बनसोडे याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे…
Share This