• Total Visitor ( 391597 )
News photo

जागतिक कर्करोग दिनानिमित्त नाशिकमध्ये 338 मुलींना HPV लसीकरण

Raju tapal February 05, 2026 103

जागतिक कर्करोग दिनानिमित्त नाशिकमध्ये 338 मुलींना HPV लसीकरण



जागतिक कर्करोग दिनाच्या “United by Unique” थीमखाली अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिक येथे एक महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत 9 ते 14 वयोगटातील 338 मुलींना एचपीव्ही (HPV) लसीचा पहिला डोस देण्यात आला. उद्घाटन कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिथा राजू यांच्या हस्ते झाले.उदघाटन प्रसंगी CCA चे फॅसिलिटी डायरेक्ट डॉ शिरीष भामरे तसेच CCA कर्मचारी,शिक्षक,पालक उपस्थित होते.गर्भाशयाचा कर्करोग हा टाळता येऊ शकणारा रोग असल्याने लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. या मोहिमेला चाइल्ड हेल्थ केअर अँड एज्युकेशनल फाउंडेशन व इन्स्पायर फाउंडेशन यांचा सक्रिय सहभाग मिळाला. तसेच एम.एस.कोठारी कन्या शाळा,श्री गुरूदेवदत्त विद्या प्रसारक मंडळ,जे.डी.सी. बिटको हायस्कूल,प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल,पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि माधवराव लेले विद्यालय यांनी पालक व विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करून कार्यक्रम अधिक प्रभावी केला. हा उपक्रम आरोग्य संस्था,स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांची उज्ज्वल साक्ष असून,पुढील डोस आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे मुलींना संपूर्ण संरक्षण मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. एकत्र येऊ,आणि कर्करोगमुक्त उद्याचा संकल्प पूर्ण करू.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement