आळंदी येथे आढळला ९ फुटी अजगर
शिरूर:- आळंदी -वडगाव रोड वरील आयजीडब्ल्यू कंपनी मध्ये मोठा साप झाडावर असल्याची माहिती वन्यजीव रक्षक आकाश सूर्यवंशी यांना २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मिळाली. त्यांनी त्वरीत घटना स्थळी जावून पाहणी केल्यानंतर अजगर असल्याचे निष्पन्न झाले. अजगराला सुखरूप पकडून वनअधिकारी भाऊसाहेब इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. एखाद्या ठिकाणी किंवा घरात साप दिसल्यावर त्याला मारू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका.वनविभागाशी किंवा सर्पमित्रांनी संपर्क करा असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन जवान सर्प रक्षक आकाश सूर्यवंशी यांनी केले आहे.