राज्यातील हवामानात सुखद बदल
Raju tapal
October 28, 2024
49
राज्यातील हवामानात सुखद बदल;
गुलाबी थंडीची चाहूल
मुंबई:-राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. पावसानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश काही भागात तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. हळूहळू किमान तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.
वादळी पावसाने उघडीप देताच थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने सकाळी हवेत गारवा आला असून, धुक्यासह दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळी गारठा वाढू लागला असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी घट होणार असून, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधूनही पावसानं केव्हाचीच माघार घेतली असून, आता तापमानत घट होण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींनी आता वेग धारण करण्यास सुरुवात केल्यामुळं हवेत गारठा जाणवू लागला आहे.
वादळी पाऊस थांबताच राज्यात आकाश निरभ्र होत, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आल्याने उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे. यातच पहाटेच्या वेळी हवेत गारठा वाढू लागला आहे. पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. पण थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान तापमानामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळणार आहे. दिवळीनंतर राज्यात थंडीची हुडहुडी भरेल. दिवाळीमध्ये पाऊस पूर्णपणे माघार गेलेला असेल अन् राज्यात थंडीची चादर पसरलेली दिसेल. राज्यात एक नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Share This