• Total Visitor ( 427934 )
News photo

५.२४ लाख विद्यार्थ्यांची 'आधार' पडताळणी प्रलंबित

Raju tapal August 22, 2025 59

५.२४ लाख विद्यार्थ्यांची 'आधार' पडताळणी प्रलंबित



३० सप्टेंबरपर्यंतच्या विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची संचमान्यता होणार आहे.



शिक्षक संचमान्यतेची चिंता; संघटनांकडून तीव्र संताप



अमरावती :- राज्यातील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांच्या वैध आधाराच्या आधारेच शिक्षकांची संचमान्यता अंतिम होणार, असा आदेश १८ ऑगस्टला शिक्षण विभागाने जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाच लाख २४ हजार विद्यार्थ्यांची अद्याप आधारची पडताळणी पूर्ण झाली नाही. यामुळे शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.



३० सप्टेंबरपर्यंतच्या पटावरील एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी वैध आधार ठरलेल्या विद्यार्थ्यांच्याच आधारावर शिक्षकांची संच मान्यता होणार, असा आदेश प्राथमिक त माध्यमिक शिक्षण संचालकांनी जारी केला आहे. यामुळे शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असल्याचे शिक्षकांनी सांगितले.



पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 'आधार'ची पूर्तता केलीच नाही. शिक्षण विभाग बचतीचे उपाय म्हणून आधार प्रमाणीकरणाच्या आडून असे आदेश काढत असल्याचे मुख्याध्यापक संघटनाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी सांगितले. तर शासनाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना आधार 'व्हॉलिडेशन'साठी स्वतंत्र मुदतवाढ द्यावी, अशी मागणी  शिक्षक संघटने केली आहे.

=====================

वर्गामध्ये विद्यार्थी हजर असतात. परंतु, अनेकदा त्यांच्या आधार कार्डवरील नावात, अक्षरात चूक असते. त्यामुळे ऑनलाइनमध्ये तो अवैध ठरतो. हे शिक्षण विभागाने समजून घेऊन योग्य ती कार्यवाहं करावी.



विजय कोंबे, राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती



==========



वैध आधार या निकषाच्या आधारावर हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. याबाबत न्यायालयात खटला प्रलंबित आहे, निकाल येणे बाकी आहे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.



राजेश सावरकर

राज्य प्रसिध्दी प्रमुख

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

=================

आधार कार्ड व बदलीचे परिणाम 

1)नवीन संचमान्यता लागू

2)कायमस्वरूपी  15000/20000 पदे निष्कासित.

3) पुढील वर्षी आणखी असंख्य पदे अतिरिक्त होतील .

4) नवीन पदभरतीला ब्रेक.

5) जि प शाळा शिक्षकाविना मोडकळीस येणार. 

6) अतिरिक्त शिक्षक समायोजनाचा प्रश्न व भविष्यात नोकऱ्या धोक्यात. 

7)पदवीधर प्रमोशन संपुष्टात येणार.

================



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement