• Total Visitor ( 593512 )
News photo

बबनराव मांढरे पाटील यांचे निधन 

Raju Tapal publisher June 14, 2026 67

बबनराव मांढरे पाटील यांचे निधन 

   

शिरूर:- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील प्रगतशील बागायतदार शेतकरी बबनराव बाजीराव मांढरे पाटील यांचे गुरूवारी (दि‌.११ जून )निधन झाले. त्यांच्या मागे ४ मुले असून नातू,पणतू असा परिवार आहे. पुणे जिल्हा कांदा उत्पादकांची सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित पुणे या संस्थेचे चेअरमन शिवाजीराव मांढरे पाटील यांचे ते वडील होते. बबनराव मांढरे पाटील "अण्णा" नावाने सर्वपरिचित होते. त्यांचा स्वभाव कणखर, स्पष्टवक्ते ,प्रामाणिक होता.त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकांना आधार दिला,मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनामुळे आमच्यासाठी काळा दिवस ठरला,आमचा आधारवड हरपला अशी भावना शिक्रापूर परिसरातील अनेकांनी व्यक्त केली.

चासकमान धरणातील पाणी शेतक-यांच्या शेतीला मिळावे यासाठी त्यांनी श्री.हनुमान पाणीपुरवठा सोसायटीची स्थापना केली होती.सन २००१ ते २०१३ पर्यंत ते पाणीपुरवठा सोसायटीचे चेअरमन होते.श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज पालखी आळंदीला जाताना त्या पालखीचे शिक्रापूर मधील मुक्कामाचे नियोजन ते करत असत. अकोले येथील अगस्त्य ऋषी यांची श्री क्षेत्र नारायणपूरला जाणारी पालखी त्यांच्या घरी आणून त्या पालखीची सेवा ते करत असत. बबनराव मांढरे पाटील यांच्या निधनानिमित्त प्रतिक्रिया व्यक्त करताना शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव घारे म्हणाले,अण्णांचे विचार,प्रेम त्यांचे कार्य,त्यांची मायेची सावली सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अण्णांची आठवण आम्हाला येत राहील.जीवनात जेव्हा मोठी संकटे,कठीण प्रसंग,आव्हाने समोर उभी राहतील तेव्हा अण्णांचा हसरा चेहरा,आत्मविश्वास देणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहील अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव घारे यांनी व्यक्त केली.

  


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement