• Total Visitor ( 700887 )
News photo

शेतातील कामे सांगितल्याच्या कारणावरून नातवाने केली आजोबांची हत्या

Raju Tapal publisher June 16, 2026 67

शेतातील कामे सांगितल्याच्या कारणावरून नातवाने केली आजोबांची हत्या



शिरूर:- शेतातील कामे सांगितल्याच्या कारणावरून नातवाने ८४ वर्षीय आजोबांची हत्या केल्याची घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे घडली. सोमवार दि.१५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बाभुळसर बुद्रुक येथील राऊत यांच्या घराच्या हद्दीत ही घटना घडली. दशरथ यशवंत राऊत वय -८४ रा.बाभुळसर बुद्रुक ता‌.शिरूर  हे त्यांचा नातू सोमनाथ याला शेतातील कामे सांगत होते. याचा राग मनात धरून सोमनाथ याने रागाच्या भरात लोखंडी गज आणून आजोबांच्या डोक्यात आणि पाठीवर जोरदार प्रहार केले. गंभीर दुखापत झाल्याने दशरथ राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार शेळके तपासी अंमलदार पवार यांनी घटनास्थळी जावून अवघ्या काही वेळातच आरोपी सोमनाथ बाळासाहेब राऊत वय -२६ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचे समजते. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026