आळंदी पोलीस ठाण्यात ४५ अर्जावर निर्णय
आळंदी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या जनता दरबारात एकाच दिवशी ४५ अर्जावर निर्णय झाले.
पोलीस उपायुक्त परिमंडळ १ मंचक इप्पर या़ंच्या नेतृत्वाखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मंचक इप्पर यांनी स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून अर्जदारांशी चर्चा केली. जमिनीचे वाद, आर्थिक फसवणूक महिलांच्या तक्रारी ,विविध वादावर तोडगा काढण्यात आला.
पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक गांगड, पोलीस उपनिरीक्षक जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, तपासी अंमलदार यावेळी उपस्थित.होते.
यापुढेही ठराविक वेळेनुसार आळंदी पोलीस ठाण्यात जनता दरबाराचे आयोजित करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी यावेळी सांगितले.