• Total Visitor ( 430385 )

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

Raju Tapal December 22, 2021 124

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद



  



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रिडा समिती अंतर्गत आयोजित केलेल्या विद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाने निर्विवाद वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.



विद्यालयाच्या नऊ खेळाडूंनी आपल्या गटात यश संपादन केले.



नम्रता कुंभार ४५ किलो द्वितीय क्रमांक, चेतना घोजगे ४९ किलो प्रथम क्रमांक, प्रतिक्षा कडू ७१ किलो प्रथम क्रमांक, प्रणोती नांबरे ७१ किलो द्वितीय क्रमांक, रूचिका ढोरे ८१ किलो प्रथम क्रमांक, ऋषिकेश चव्हाण ६७ किलो प्रथम क्रमांक,  अक्षय म्हाळसकर ७१ किलो तृतीय क्रमांक, चिराग वाघवले १०२ किलो प्रथम क्रमांक, सौरभ वाडकर १०२ किलो द्वितीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये यश मिळविले आहे. 



या विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.



इंद्रायणी विद्यामंदीर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement